शहर

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सुरज कश्यप हा (15) वर्षीय मुलगा तीन दिवसापासून बेपत्ता ….

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील (15) वर्षीय मुलगा गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाला आहे

या मुलाचे नाव सुरज कश्यप वय वर्ष (15) असे असून तो सफाळे राजगुरू हम पंडित या हायस्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.

तो मूळचा राहणारा बलिया जिल्हा (युपी) गाव शिवपुर येथील रहिवासी असून तो त्याच्या आईवडिलांसोबत गेल्या तीन वर्षापासून सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सफाळे पूर्व डोंगरी चिंचपाडा येथे राहतो गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी तो संध्याकाळी 6.30 वाजता घरातून बाहेर पडला तो आज तगायत घरी परतलाच नाही याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी सफाळे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे.

या मुलाबाबत काहीएक माहिती प्राप्त झाल्यास सफाळे पोलीस ठाणे भ्रमणध्वनी क्रमांक 9923962304 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन सफाळे पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button