महाराष्ट्र

जोपर्यंत पेसा भरती करत नाही तोपर्यंत बिगर आदिवासी ठेकेदार पुढारी यांना बंदी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत कार्यालय झाप येथे लोकनियुक्त सरपंच एकनाथ पांडू दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली त्यामधे झाप ग्रामपंचायत ने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

यात विषय क्रमांक.४ पेसा नोकर भरती प्रक्रिया वर चर्चा करणे या विषयावर चर्चा झाली असता उपस्थित रामदास पागी यांनी सदर विषय मांडला त्यामधे उपस्थित ग्रामस्थांनी खालील प्रमाणे निंर्णय घेतले.जो पर्यंत पेसा भरती होत नाही तोपर्यंत बिगर आदिवासी पुढारी यांना झाप ग्रामपंचायत मधे बंदी करण्यात आलीआहे. पेसा भरती होत नाही तो पर्यंत एकही बिगर आदिवासी ठेकेदाराला ग्रामपंचायत मधे काम करता येणार नाही.ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय कुणालाही कोणतेही काम करता येणार नाही.असे निर्णय पास करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व सर्व पेसा अध्यक्ष व असंख्य मतदार उपस्थित होते.यावेळी सर्वाणुमते निर्णय घेऊन अमलबजावणी करण्यात यावी अशा एकमुखी निर्णय उपस्थितांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button