पालघर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक गावात वंध्यत्व निवारण अभियान मोहीम
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागमार्फत 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक गावात वंध्यत्व निवारण अभियान राबवण्यात येणार आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विराथन खुर्द येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1व पंचायत समिती पालघर यांच्या मार्फत गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार राजेंद्र गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
19 डिसेंबर 2023 पर्यंत हे शिबिर पालघर जिल्ह्यातील गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. व्यंधत्व निवारण शिबिरात जास्तीत जास्त पशुपालकांनी आपल्या पशुधनाची तपासणी करून घ्यावी व व्यंधत्वावर त्वरित औषधोपचार करावेत असे आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. जनावरांचा ‘भाकड काळ हा दुग्ध व्यवसाय तोट्यात जाण्याचे प्रमुख कारण आहे. जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारण हे जनावरांतील वंध्यत्व असून जनावरांतील व्यंधत्व भाकड काळ कमी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात वंध्यत्व निवारण अभियान राबवण्यात येत आहे.
जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भावामुळे गाई-म्हैशींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होवून वंध्यत्व येण्याची शक्यता विचारात घेऊन ते टाळण्यासाठी पशुधनावर जनावरांना जंताचा प्रादुर्भाव असणे सकस संतुलीत पशु आहाराचा अभाव, खनिजाची कमतरता असणे, गोठ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित नसणे, जनावर ऋतुचक्रानुसार माजावर न येणे, गर्भाशयातील दोष, मागील वेतातील कष्टप्रसावन आदी कारणामुळे वंध्यत्व येते तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषध फवारणी करून शेण तपासणीनंतर जंत प्रादुर्भाव दिसून आल्यास जंत निर्मूलन तसेच रक्त तपासणीनंतर त्यामध्ये काही घटकांची कमतरता दिसून आल्यास योग्य त्या औषधोपचारांचा अवलंब करण्यात यावा. गायी म्हैशींमध्ये माजाचे चक्र नियमितपणे दिसून येणाऱ्यासाठी पशुंचा आहार व त्यांचे स्वास्थ्य यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 21 दिवसांच्या अंतराने माजाचे चक्र दिसून येणे अथवा गर्भधारणा अपेक्षित असून या दोन्हींचा अभाव असल्यास पशुधनामध्ये व्यंधत्व असल्याची शक्यता असते या करीता हे शिबिर सर्व पशू वैद्यकीय दवाखाने व पशू चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांनी दिली. सर्व पशुपालकांनी या वंधत्व निवारण अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी केले आहे.