शहर

पूनम प्रकाश कुडू यांना मुंबई विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ (PhD) पदवी प्रदान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

सौ.पूनम प्रकाश कुडू (पूर्वाश्रमीच्या पूनम परशुराम भोईर राहणार सफाळे विराथन बुद्रुक चाफेवाडी ) यांना मुंबई विद्यापीठाकडून मानव्यविद्या शाखेतील ‘विद्यावाचस्पती’ ( पीएचडी ) ही सर्वोच्च पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे .

त्यांनी ‘अर्जुन डांगळे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास’ या संशोधनपर विषयावर आपला प्रबंध सादर केला होता.
१२ मार्च २०२६ रोजी विद्यापीठात पार पडलेल्या मौखिक परीक्षेनंतर त्यांच्या या यशाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे .

पूनम कुडू यांनी डॉ. शत्रुघ्न फड (मराठी विभाग अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई) यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० पासून आपल्या संशोधनास सुरुवात केली होती. अत्यंत चिकाटीने आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आपले संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे .

त्यांच्या मौखिक परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे डॉ. अनिल सकपाळ यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले तर कोल्हापूरचे डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी बाह्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी विविध क्षेत्रांतील सुमारे ३० अभ्यासक आणि संशोधक उपस्थित होते.

सौ. पूनम यांच्या या यशात त्यांचे सफाळे विराथन बुद्रुक चाफेवाडी गावात राहणारे वडील श्री. परशुराम गजानन भोईर आणि विरार अर्नाळा येथील पती श्री. प्रकाश हिरा कुडू यांचा मोलाचा वाटा असून दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात अखंड पाठबळ दिले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button