माळीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

माळीनगर---प्रतिनिधी
रियाज मुलाणी मो.9921 500 780
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे, पर्यवेक्षक रितेश पांढरे,सहशिक्षक सुनील लांडगे,उमा महामुनी,संजय बांदल व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सिद्धी हेगडकर,पंकजा धायगुडे, स्नेहा माळी,श्रद्धा बोरावके,सानिका होनमाने, पियुष आरडे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेन भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शिक्षक महेश शिंदे व राजू कांबळे यांनी “माझी मैना गावाकडे राहिली,माझ्या जीवाची होते कायली” हे सुंदर गीत सादर केले.कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भाषण विद्यार्थीनी प्रांजली साळुंखे हिने तर आभार सिद्धी तुपे हिने मानले.



