मोटर सायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणून त्या मोटरसायकल जप्त करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या पथकाला यश.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर बोईसर येथील मोटर सायकल पार्किंग मधील मोटर सायकल चोरी करणाऱ्या 2 चोरांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील 5 मोटरसायकल जप्त करून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या पथकाला सोमवारी यश आले आहे.
पालघर जिल्ह्यातील 2023 या चालू वर्षातील मोटर सायकल वाहन चोरीचे गुन्हे पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपी गुमनाम होते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अनिल विभूते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांचे भरारी तपास पथक तयार केले होते.
या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीच्या आधारे संतोष बापूराव पाटील वय वर्ष (25) राहणार बोईसर सरावली मुळगाव जळगाव व गणेश छोटू मोरे वय वर्ष (25) बोईसर सरावली जळगाव या दोघांना पार्किंग मधील मोटार सायकल चोरी केल्याप्रकरणी 1 ऑगस्ट 2023 रोजी अटक करून त्यांना जेरबंद करून त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी पालघर पोलीस ठाणे हद्द येथे 1 मोटर सायकल व बोईसर पोलीस ठाणे हद्दीत 4 मोटर सायकल अशा एकूण 5 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.या सर्व चोरीच्या 5 मोटरसायकल बोईसर पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशान्वये अनिल विभुते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस हवालदार कैलास पाटील, दिनेश गायकवाड, संदीप सरदार, कपिल नेमाड आणि सर्व नेमणूक अमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.



