महाराष्ट्र

महात्मा गांधी ,महात्मा फुले आणि इतर महामानवा बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या वर कायदेशीर कारवाई करा– ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र राज्य यांची मागणी

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—-9730 867 448

वारंवार व नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटक संभाजी भिडे हा समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परवाच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात कायद्यानुसार कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

कारण नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे हा त्यांचा हेतू असून समाजा समाजाचे मध्ये दरी निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा त्याचा मनसुबा स्पष्ट दिसतो 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन नसून दुखवटा दिन साजरा करावे असे वक्तव्य केले होते त्याचबरोबर तिरंगा झेंडा हा भारताचा झेंडा असू शकत नाही तसेच भारत देशाचे राष्ट्रगीत जजगणमन अधिनायक जय हो भारत भाग्यविधाता हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही काही महिला पत्रकारांना तुम्ही टिकली लावली नाही मला प्रश्न विचारू नका हा मनुवादी विचार मनुस्मृतीला प्रिय असणारा विचार या संविधानाच्या देशामध्ये उगवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत.

अंधश्रद्धा देखील पसरवत आहेत माझ्या झाडाचे आंबे खाल्ल्यावर मुलं होतात अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत तसेच पंतप्रधानाने युनो मध्ये भाषण करत असताना सांगितले की भारत देशाने जगाला बुद्ध दिलेला आहे बुद्धाचा विचार दिलेला आहे त्या वक्तव्याला देखील छेद देत बुद्ध काही कामाचा नाही आसे द्वेषजनक वक्तव्य केले
अशा प्रकारे एक नाही तर अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत त्यामुळे संभाजी भिडे सारख्या विघ्न संतोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल ज्योति क्रांति परिषद महाराष्ट्रसृ राज्य परिषदेच्या वतीने निदर्शने करून अकलूज उपविभागीय अधिकारी तहसीलदार माळशिरस अकलूज पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारले

याप्रसंगी विशाल फुले ,गौरव एकतपुरे ,बापूराव एकतपुरे ,राजू एकतपुरे, संजय एकतपुरे ःबापूराव बनकर ,दीपक बनकर, आनंद एकतपुरे ,अरविंद राऊत, जयदीप एकतपुरे ,अक्षय बनकर, विशाल जगताप ,हार्दिक गिरमे, बाळासाहेब फुले ,रवी फुले’ तसेच बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button