शहर

महिला महाविद्यालय करिअर कट्टाची टीम आणि सेवा इंटरनॅशनल बंगलोर पोहचली मदतीसाठी …

यवतमाळ प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव

स्थानिक श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय,पुसद.येथिल करिअर कट्टा ह्या उपक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या अन्नपूर्णा एकंम्लिटन्युट्रशन गाईड ह्या प्रशिक्षणा अंतर्गत बंगलोर येथील सेवा इन्टरनॅशनल संस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पुरग्रस्थांना कपडे,धान्य,इन्स्टंट उपमा, सॅनिटरी पॅड,पुरग्रस्थांना वितरित करण्यात आले.

करिअरकट्टाच्या जिल्हा समन्वयक डॉ रंजना जीवने ह्यांनी पुसद परिसरातील महिलांना वस्त्रदान करण्याचे आव्हान केले होते.दोन दिवसात पुसद येथिल विविध परिसरातील महिलांनी साड्या,ड्रेस,ब्लँकेट दान दिले,बंगलोर येथिल सेवा इंटरनॅशनल संस्थेने,सॅनिटरी नॅपकिन,किराणा,उपलब्ध करुन दिला,महिला महाविद्यालयाच्या अन्नपूर्णा कोर्सच्या विद्यार्थीनींनी,त्वरित होण्यासारखे खाद्यपदार्थ तयार केले.

राहुर,आनंदवाडी,हिवरा संगम ह्या तीन गावामध्ये जवळपास 65 कुटुंबांना प्रत्यक्ष तिथे जाऊन मदत केली.
या वेळी बोलताना डॉ.रंजना जिवने म्हणाल्या की नाईक साहेबांचा शेतकऱ्यांना मदत करण्याचा वारसा आणि संस्कारातुन आमचे महाविद्यालय ही प्रथा सातत्याने पाळत असते. त्यामुळे पुरग्रस्थांना आमच्या महाविद्यालयाच्या वतीने फुल नाही तर फुलाची पाकळी देण्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहचलो आहे.
ह्यावेळी महागाव येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री राजुभाऊ राठोड ह्यांनी संपुर्ण मदत केली.

राहुर येथिल मेजर आखरे काकांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.ह्यावेळी अन्नपूर्णा टीमच्या प्रमुख डाॅ.रंजना जीवने,डॉ. अर्चना भोयर, तसेच अन्नपूर्णा कोर्स मधील विद्यार्थीनी अनुराधा जोगदंडे,करिअरकट्टाच्या करिअर संसदच्या मुख्यमंत्री स्नेहल बरडे,निशिगंधा वायकुळे,शिवकन्या गव्हांडे,लक्ष्मी कानडे,आरती जाधव,स्वाती जाधव,नंदिनी राठोड ह्या विद्यार्थीनी ह्यावेळी उपस्थित होत्या.

ह्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी महागावचे,सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ राठोड ह्यांनी खुप मदत केली.ह्या सर्व कार्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना वानखेडे मॅडम व महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकांनी सहकार्य केले व शुभेच्छा दिल्या.तसेच निखील मोरथकर,शिवजी गोपणवाड,चयन राठोड,कुणाल राठोड,गोपाल गंधेवार यांनी हा उपक्रम राबविन्या करिता सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button