भिड भिडे पोट वाढे विकृत व मनोरुग्ण भिडे ला वेळीच आवरा

बी.टी.शिवशरण
ग्रामीण भागात मराठीत एक मार्मिक म्हण आहे भिडे भिड पोट वाढे याचा गर्भित अर्थ समंजस लोकांना वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही तसे विकृत मनोरुग्ण संभाजी भिडे यांची वक्तव्ये भाषणे व त्यांचे विचार हे भारतीय संस्कृतीचे विरोधात तसेच संविधानाच्या विरोधात असतानाही महाराष्ट्र सरकार त्यांचेवर कारवाई करण्यात कुचराई करीत आहे भिडे गुरुजी यांनी समस्त गुरुजी या उपाधीला कलंकित केले आहे नव्हे गुरुजी हा शब्द त्यांनी गटारगंगेत मिळवला आहे
त्यामुळे हा इतका बेशरम मुर्ख माणुस फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात निपजला याची लाज वाटावी इतपत त्याच्या तोंडाची गटार दुर्गंधी पसरवत वहात आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बद्दल अपशब्द राष्ट्रगीत तसेच तिरंगा ध्वज या बद्दल बेताल बोलून त्यांचा उपमर्द करतो संविधानाने दिलेल्या कायद्याच्या विरोधात बोलतो तरी महाराष्ट्र सरकार त्यांचेवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात पाऊल उचलत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
पुर्वी गावगाडा चालवताना गावांत मोकाट जनावरे जर गावकऱ्यांना त्रास देऊन उच्छाद मांडत तेव्हा त्यांना कोंढुन ठेवण्यासाठी कोंडवाडा असायचा तशाच प्रकारे आपल्या विखारी वाणीने अवघे समाजमन व इथली व्यवस्था दुषीत करणार्या भिडेना त्यांचे वय पहाता सरकारने वेगळा कोंडवाडा करुन त्या कोंडवाडयात त्यांचे अखेरचे दिवस मोजण्याची व्यवस्था करावी म्हणजे इथुन पुढे तरी भिडे यांच्या अशुध्द वाणीची गटारगंगा वाहुन दुर्गंधी तरी पसरणार नाही



