महाराष्ट्र

सर्वसमावेशक १ रु मध्ये पीक विमा भरण्याची सुविधा– पिक विमा भरून घेणे काळाची गरज

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . —–97 30 867 448

माळशिरस तालुक्यात नातेपुते मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेतातील २६ गावच्या ३ महसुल मंडळ मध्ये २५ जुलै अखेर सदाशिवनगर मध्ये २४ .५ मिली , दहीगाव मध्ये २५ .९ मिली , नातेपुते मंडळ मध्ये ६४.१ मिली व तालुक्यात ११५.८ मिली पावसाची नोंद झाली आहे. एकीकडे खरीप हंगामातील १.५ महिमा संपला आहे व समाधानकारक पाऊस झालेला नाही. अवर्षन , दृष्काळ , किंवा भविष्यात होणारी अतिवृष्टी , भुस्खलन मुळे पीक पेरणी संभाव्यक्षेत्र पीक वाढीची आवस्था वा पीक काढणी प्रश्चात होणारे पीकाचे नुकसान व त्यावर पीक विमा कवच चा फायदा घेणे काळाची गरज आहे,

माळशिरस तालुक्यासाठी सर्व महसुल मंडळसाठी बाजरी, तूर, कांदा, मका, भूईमुग अधिघोषीत पीके असून या पिकासाठी शासन प्रति १हेक्टरला १ रु मध्ये विमा संरक्षण देणार आहे व भरून घेणाऱ्या देणाऱ्या महाईसेवा समाईक सुविधा केंद्राला प्रति लाभार्थी ४० रु सेवा शुल्क राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. या पिकाचा सर्वसमावेशक विमा भरणे साठी पेरणी केलेल्या किंवा संभाव्य पेरणी करावयाचे क्षेत्राचा ईपीक पाहणी ७ /१२ , ८अ , आधारकार्ड , बैक पासबुक व ईपीक पाहणी ७ / १२ नसेल तर पेरणी क्षेत्र किंवा संभाव्य पेरणी क्षेत्राचे पीक पेरा स्वयंघोषणापत सह विमा उतरविता येतो . सर्वसमावेशक पीक विमा ४ पद्धतीने भरण्याची सुविधा ३१ जुलै अखेर शासनाने उपलब्ध करून दिली आहे . १- सामुहिक सुविधा केंद्र ( csc centre ) मध्ये वरील कागदपत्रे घेऊन १ रु मध्ये सर्वसमावेशक पीक विमा उतरविता येईल .

२- ओरिअँन्टल इन्सुरन्स कंपनी माळशिरस तालुका विमा प्रतिनिधी श्री पळसे मोबाईल नं .7083697172 यांचे कडे वरील कागदपत्रे घेऊन मोफत विमा उतरविण्याची सुविधा उपलब्ध आहे.३- सर्वसाधारणपणे ६०% शेतकरी बांधवांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहे मोबाईल मध्ये प्लेस्टोअर / गुगल स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स ( crop insurance app ) डाऊनलोड करून निव ( new ) फार्मर ( farmer ) रजिस्टेशन (Registration ) नंतर गेस्ट लॉगीग ( guest logging ) मध्ये लाँगीग आयडी पासवर्ड सेट करावा ( logging Id व and password set) > तदनंतर पर्सनल डिटेल्स ( personal detail ) मध्ये शेतकरी नांव आधार कार्डवरील नावाप्रमाणे, मोबाईल नंबर , पत्ता आआधारनबर , बॅकपासबुक महिती भरावी > तदनंतर ७ / १२ वरील महिती भरावी > तदनंतर बैक पासबुक नोंदी भरून बॅक पासबुकची १ookB मधील जीपीजी इमेज / पीडीएफ अपलोड करावी > ईपीक पहाणी ७ / १२ नोंदी वा स्वयंघोषणापत १०० k b आतील जीपीजी ईमेज अथवा पीडीएफ अपलोड करावी > तदनंतर जनरेट टोकन ( Generate token ) सह १ रु प्रति हेक्टरी नेटबँकींग , भीम फोनपे , UPI ने भरून फॉमी सबमिट करावा व विमा घरच्या घरी उतरविण्यात यावा .

४- गुगल सर्च इंजीन मध्येPMFBY,@gov.in वेबसाईड सर्च करून फार्मर लॉगीग ( Farmer logging ) करून नंतर क्रॉप इन्शुरस्न अॅपवरील प्रमाणे सर्व सुचना पर्सनल डिटेल्स ते शेवट १ रु भरेपर्यत जी सुचना अवगत करून महिती भरून विमा कवच लाभ घेता येतो . . तरी वरील पैकी १ पद्धतीचा वापर करून १ रु सर्वसमावेशक विमा उतरविण्याचा प्राधान्याने प्रयत्न करून सदय व भविष्यातील जोखमीवर मात करुण खंबीर पणे उभे राहण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे . अधिक माहिती ,मार्गदशन सल्ला मदत साठी नजीकचे कृषि अधिकारी ,कर्मचारी , कार्यालयाशी संपर्क करून ३१ जुलै पूर्वी पीकविमा उतरविण्याची त्वरा करावी असे अहवान करण्यात येत आहे
सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी नातेपुते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button