शहर

दारू नाही आणून दिली म्हणून नवऱ्याने केली बायकोची लाकडी दांडक्याने हत्या.. आरोपीला तात्काल अटक करण्यात डहाणू कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

बायकोने नवऱ्याला बाहेरून दारू आणून नाही दिली म्हणून तिला लाकडी दांडक्याने मानेवर जबरी मारहाण करून तिची हत्या केली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू कासा पोलीस ठाणे हद्दीतील मोडगाव खोरीपाडा गावात रविवारी घडली आहे.या आरोपीला कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी तात्काळ अटक केली असून या आरोपीला कोर्टाने 30 मार्च 2024 पर्यंत पोलीस पोलीस कोठडी सुनावली आहे . डहाणू कासा पोलीस ठाणे हद्दीतील मोडगाव खोरीपाडा गावात राहणारे राध्या बाबल्या धापशी वय वर्ष (38 ) यांनी रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी भारती राध्या धापशी वय वर्ष (44) हिला बाहेर जाऊन मला पिण्यासाठी दारू घेऊन ये असे सांगितल्यावर भारतीने नकार दिला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून घरातील एका दांडक्याने तिच्या मानेवर जबरी मारहाण केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.याबाबत तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या पोलीस तक्रारीवरून भारती धापशीचा नवरा राध्या धापशी याला तात्काळ कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 30 मार्च 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास जव्हार उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व कासा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button