शहर

सफाळे पोलीस ठाण्यात 14 वर्षीय शाळकरी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील एका (14) वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. ती शाळेतून घरी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले आहे अशी तक्रार तिच्या आईने सफाळे पोलिस ठाण्यात दिल्यावर सफाळे पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

नेहा जगदीश हरिजन असे तिचे नाव असून ती सफाळे येथील मालकरी पाडा गावात राहत होती ती सफाळे येथील राजगुरू हमपंडित विद्यालय इयत्ता नववी मध्ये शिकत होती .सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी ती तिच्या शाळेतून 12.30 वाजता घरी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले आहे. अशी तक्रार तिच्या आईने सफाळे पोलीस ठाण्यात दिल्यावर सफाळे पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात 24 जुलै रोजी गुन्हा दाखल केला असून याबाबत या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास सफाळे पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.बी. सावंत करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button