शहर

उस्मानाबाद येथे पोलिस अधिक्षक कार्यालयात शांतता कमेटी ची बैठक संपन्न

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

उस्मानाबाद जिल्ह्यात साजरे होणाऱ्या शिवजयंती, रामनवमी तसेच रमजान या उत्सवानिमित्त जिल्ह्यात 23मार्च 2023 ते 6 एप्रील 2023 या कालावधीत जमावबंदी व शस्ञबंदी आदेश देण्यात आले आसुन त्या अनुषंगाने मंगळवार दि.28मार्च 2023 रोजीपोलिस आधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथे बेंबळी येथील सर्वधर्मीय शांतता कमिटीचे बैठक एस .पी. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. या प्रसंगी बेंबळी ग्रामस्थांच्या वतीने एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

एस.पी. श्री. अतुलजी कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली व अतुलजी कुलकर्णी सरांचा बेंबळीतिल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी या बैठकीला बेंबळी येथील ए.पी.आय. मच्छिन्द्र शेंडगे नूतन ए.पी.आय. . शिंदे साहेब, सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, तथा नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button