एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात जबरदस्त हादरा…

🎯 जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांचा धक्कादायक राजीनाम्याने जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार का…?
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापुरात मोठा धक्का बसला असुन सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत यांनी आपला राजीनामा थेट शिंदे यांच्याकडे सादर केल्याचे टाइम्स 9 च्या सुत्रांनी सांगितले…
सदरच्या राजीनामा पत्रात सावंत यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड मला विचारात न घेता केली गेली असुन माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष व शहरप्रमुख यांचीही निवड माझ्या परस्पर झाली असल्याचे ते म्हणाले…
पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नाही काय…? असा सवाल देखील प्रा सावंत यांनी उपस्थित केला असुन त्यांच्या राजीनाम्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे…
हा राजीनामा सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटासाठी खळबळजनक ठरला असून,येत्या काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया राजकीय “प्रकांड पंडित” करत आहेत…
सबंध महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या गटाला घरघर लागलेली असताना आणि आज स्वतः शिंदे हे दिल्ली येथे पोहोचले असताना सोलापूर जिल्ह्यातील प्रा राहुल सावंत यांच्या राजीनाम्याने मात्र शिंदे गटात “अलबेल” नसल्याचे दिसून येत आहे…



