वाणगाव चिंचणी कोलवली येथील पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालेला किरण संखे यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांचा धनादेश देताना खासदार राजेंद्र गावित आणि डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख.
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील वाणगाव चिंचणी येथील कोलवली रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालेल्या किरण संखे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन शनिवारी खासदार राजेंद्र गावित आणि डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी 4 लाख रुपयांच्या शासकीय धनादेशाची आर्थिक मदत केली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाणगाव चिंचणी येथील कोलवली रस्त्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाऊन किरण संखे वय वर्ष (51) यांचा गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यामुळे संखे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किरण संखे घरातील एकमेव कुटुंबाचा आधार होता.त्याला दोन लहान मुली असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमरीची वेळ येऊ नये म्हणून शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी खासदार राजेंद्र गावित आणि डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी किरण संखे यांचा निवासस्थानी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबाला भेट दिली व 4 लाख रुपयांचा शासकीय धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला आहे.