शहर

वाणगाव येथे सरकत्या जिन्याचे उद्घाटन खासदार श्री.राजेंद्र गावित यांच्या हस्ते संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या वाणगाव रेल्वे स्टेशन येथे सरकता जिना नसल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. वयोवृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांना रेल्वे पुल ओलांडताना कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात या समस्यांचा येथील प्रवाशांना अधिक त्रास होत असल्यामुळे अनेक वर्षांपासून या स्थानकावर आधुनिक स्वयंचलित सरकत्या जिन्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने वाणगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना उभारण्याचे काम केले. सदर जिना लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी खासदार श्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना खासदार श्री राजेंद्र गावित यांनी स्थानिक प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणींची विचारपूस केली. रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत लोकांनी सुचवलेले बदल आपण लवकरच रेल्वे प्रशासनाला सांगणार असून योग्य ते बदल केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी प्रवाशांना दिली.

लोकांच्या सेवेत दाखल झालेल्या या अत्याधुनिक सरकत्या जिन्यामुळे महिला, वयोवृद्ध, विद्यार्थी व रुग्ण यांना खूपच फायदा होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाने सदर जिन्याची योग्य ती देखभाल घेऊन प्रवाशांना काही अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिल्या यावेळी या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, वाणगाव रेल्वे स्टेशन अधीक्षक किशोर जाधव, वाणगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, डहाणू रेल्वे सुरक्षा बल पोलीस निरीक्षक कपिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button