शहर

सफाळे येथे झालेल्या अपघातात आकाश चौधरी याचा अखेर मृत्यू.. कुटुंबीयांनी केला संशय व्यक्त अपघात की घातपात.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

गटारी अमावस्येच्या दिवशी सफाळे येथे अपघात होऊन जबरी जखमी झालेल्या विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील आकाश चौधरीचा शनिवारी सिलवासा येथील डॉक्टर विनोबा भावे सिव्हिल रुग्णालयांमध्ये अखेर मृत्यू झाला.हा अपघात नसून त्याच्या अंगावरून गाडी गेल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

आकाश पंढरी चौधरी वय वर्ष (26) हा आई-वडिलांचा एकुलता एक अविवाहित मुलगा होता. रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी गटारी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान आपल्या विराथन बुद्रुक गावातून विटी लाईन रस्त्याने दुचाकी वर बसून सफाळे येथे जात असताना सफाळे फ्लेवर रेस्टॉरंट जवळ त्याचा अपघात झाला होता. या अपघातात त्याला जबरी मार लागला होता. तसेच त्याच्या कमरेच्या भागा निकामी झाला होता. या दरम्यान त्याला त्वरित उत्तरासाठी मुंबई कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते परंतु त्याला जबरी मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सिलवासा येथील डॉक्टर विनोबा भावे सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केले असताना त्याचा शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button