शहर

नवी मुंबई कोपर खैरणे येथील (17) वर्षीय पराग बेलदार गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता.

टाईम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क . प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

ठाणे नवी मुंबई कोपर खैरणे येथील (17) वर्षीय पराग बेलदार हा बारावीत शिकणारा विद्यार्थी गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे.

क्लासला जातो असे सांगून तो शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता घरातून बाहेर पडला होता. तो आज तगायत परतलाच नाही. वय वर्ष (17) पराग सुनील बेलदार असे त्याचे नाव असून तो मूळचा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील राहणार आहे तो शिक्षणासाठी ठाणे नवी मुंबई कोपरखैरणे येथील त्याचे काका गणेश बेलदार यांच्याकडे राहत होता. या मुलाबाबत काही एक अधिक माहिती प्राप्त झाल्यास ठाणे नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील 7715097112 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ठाणे नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button