महाराष्ट्र

करमाळा तालुक्यातील नुतन प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्रात वैद्यकीय आधिकारी ,कर्मचारी भरती करून तात्काळ सुरू करण्यात यावीत : उत्तरेश्वर कांबळे

करमाळा प्रतिनिधी: अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नुतन प्राथमिक आरोग्य केंद्र जिंती येथे गेल्या 2 वर्षांपासून काम पुर्ण होऊन तर जेऊर येथे ग्रामीण रुग्णालय गेल्या 4 वर्षांपासून फक्त वैद्यकीय आधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,कर्मचारी नसल्याने धूळखात पडून आहेत तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोफळज, उमरड, वडशिवणे, गुळसडी, सावडी, बिटरगांव, पाडळी ,पांगरे,पोथरे येथे इमारत बांधकाम पूर्ण होऊन तयार आहेत .

याठिकाणी वैद्यकीय आधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कर्मचारी, मदतनीस यांची तात्काळ नेमणूक करण्यात करून ती तात्काळ सुरू करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रे सुरू झाल्यास सर्व सामान्य नागरीकांची ( रूग्णांची) सोय तातडीने होण्यास मदत होईल , निवेदन नमूद केले आहे की भरतीची प्रक्रियेत कर्मचारी नेमणूकीला स्थानिक उमदेवारांना प्राधान्य देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button