मोरोची ता माळशिरस येथे महा बाबा फाउंडेशन च्या वतीने आश्रम शाळेत ब्लॅंकेट्स वाटप

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
सदाशिवनगर येथील महाबाबा फाउंडेशन चे अध्यक्ष हुसेन मुलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त मोरोची ता. माळशिरस जि. सोलापूर येथील समाज जागृती व सेवा संघ संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत गरीब व गरजू 50 मुलींना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले

या महाबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आज तागायत विविध सामाजिक उपक्रम राबवले असून” देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे” या उक्तीप्रमाणे या फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिक्रिया आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ च्या वतीने देण्यात आली आणि” बेटी बचाव -बेटी पढाओ” यासाठी व मुलींना शिक्षणासाठी ”हुसेन मुलाणी” यांनी प्रोत्साहन दिले यापुढेही त्यांच्या हस्ते असेच सत्कार्य घडावे अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली

याप्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व निवासी मुले व मुली उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त वाटप केलेल्या ब्लॅंकेट्स बाबत आश्रम शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले



