उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर” नऊ दो ग्याराह ” करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अकलुज —-प्रतिनिधी
लक्ष्मीकांत -कुरुडकर
मो.7020 665 407
राष्ट्रवादी पक्षाचे नेते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांचा 17 जून2023 रोजी वाढदिवस होता त्यानिमित्त अकलूज येथील महर्षी चौक आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ असे वाढदिवसाचे दोन बॅनर रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी नगर परिषदेच्या परवानगीने लावण्यात आले होते

हा बॅनर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी कोणाच्यातरी सांगण्यावरून काढून” नऊ दो ग्यारह “करण्यात आले आहे हा बॅनर ज्यांनी काढला आहे त्याचा या दोन्ही ठिकाणच्या आसपास असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा शिवाय त्याच्यामागे असलेला मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे अकलूज पोलीस कडे केली आहे
याप्रसंगी अशोकराव गायकवाड, साजिद भाई सय्यद, राहुल ढेरे पाटील ,राजीव गायकवाड ,इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते



