महाराष्ट्र

महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून आमदार दत्तात्रय भरणे मामांच्या समावेशासाठी कार्यकर्त्यांचा श्री लक्ष्मी नरसिंहास साकडे.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123

सध्याच्या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे मामा यांचा समावेश व्हावा यासाठी येथील कार्यकर्त्यांनी श्री लक्ष्मी नृसिंहास अभिषेक करून साकडे घातले.

महाराष्ट्राच्या शिंदे, फडणवीस सरकारमध्ये नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा अंजीर पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यांच्या नऊ मंत्र्यांना शपथ व खाते वाटपही देण्यात आले. आता अधिवेशनानंतर होणाऱ्या विस्तारात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे मामा यांचा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी नरसिंहपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शंकर राऊत यांनी श्री लक्ष्मी नरसिंहास अभिषेक करून साकडे घातले. यावेळी सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, संतोष क्षिरसागर, रामभाऊ कांबळे, मनोज मासुळे, अक्षय घोडके, विकी मगर, अक्षय निकम, किरण बंडलकर, दीपक जाधव आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button