महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मधील विकासकाम का रेंगाळलीत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये विकासकामे का रेंगाळली आहेत असा सवाल नागरिकांना पडला आहे मध्यंतरी पाच कोटी निधी उपलब्ध झाल्याची माहिती सांगण्यात आली मात्र नगरपंचायत मध्ये किरकोळ काही कामं सोडली तर विकासाची भरीव व दुरगामी परिणाम साध्य होणारी कोणतीही मोठी कामं होत नसल्याने नागरिकातुन उघड नाराजी व्यक्त केली जात आहे
नगरविकास विभागाचे माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते माळशिरस अकलूज वैराग माढा या नगरपंचायत नगरपरिषद यांना मिळालेल्या निधीतून अनेक कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे मात्र मग महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ला आलेल्या निधीतून विकासाची कामे का होत नाहीत असे नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे स्थानिक राजकारण गटबाजी याचा फटका तर बसत नाही ना गेल्या सात महिन्यांपासून काही अपवादात्मक किरकोळ काम वगळता नगरपंचायत अंतर्गत गटारी रस्ते नळपाणी शौचालय बांधकाम ही काम रखडवली आहेत तसेच नगरपंचायत हद्दीत. प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक बंदी निर्णय याची कारवाई करण्यात टाळाटाळ केली जाते या व इतर महत्वाच्या विषयांवर नगरपंचायत विकासाची कामे करण्यात हलगर्जीपणा तर करत नाही ना अशा उलट सुलट प्रतिक्रिया चर्चा ऐकायला मिळत आहेत



