महाराष्ट्र

वाणगाव पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळ यांच्या आदेशान्वये नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आत्माराम कहाळे याआधी शिर्डी गुन्हे शाखा,नालासोपारा तुळीज पोलीस ठाणे, पालघर पोलीस ठाणे येथे कार्यरत होतो. 2020 ते 2022 या कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे सफाळे पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्या मार्गदर्शना खाली सफाळे भागातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद केले आहे.तसेच या भागातील जुगारा सह गावठी दारूबंदी करून गुन्हेगारीला अंकुश लावला आहे. यानंतर त्यांची बदली उपविभागीय कार्यालय पालघर विभाग येथे करण्यात आली होती. त्यांच्या या कौशल्यपूर्ण कामाची दखल घेऊन जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळ यांनी बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 पासून त्यांची नियुक्ती वाणगाव पोलीस ठाणे इन्चार्ज पदी केली आहे. याआधी वाणगाव पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button