महाराष्ट्र

आँनलाईन सातबारा उतारा नुतनीकरणाची कामे ववांगी गृप ग्रामपंचायतीचा निधी तात्काळ वर्ग करा.अन्यथा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.डाॅ विजय रोकडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी. अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मागील वर्षी राज्य शासनाकडून वांगी गावाचे विभाजन करुन वांगी.१,२,३,४ या स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करुन महसुली गावाचा दर्जा देण्यात आला.त्यामुळे गावातील शेतकर्यांच्या जमिनीचे भूमापन क्रमांक बदलून चार ही गावांचे युनिक कोड नव्याने देण्यात आले आहेत.परंतु अद्याप पर्यंत सात बारा नुतनीकरणाची कामे प्रलंबित आहेत.त्यामुळे सोलर पंपासाठी आँनलाईन अर्ज करण्यासाठी गेले असता आँनलाईन अर्ज स्वीकारला जात नाही.त्यामुळे इच्छूक शेतकर्यांवर या योजनेपासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

तसेच विभाजना पूर्वीच्या वांगी गृप ग्रामपंचायतीचा एक कोटी हून अधिक निधी मागील एक वर्षापासून वर्ग करण्यावाचून पडून राहीला आहे.त्यामुळे नव्याने निर्माण झालेली गावे विकास कामांपासून वंचित राहीली आहेत.परिनामी वांगी१,२,३,४,ग्रामस्थांना याचा फटका बसत असून विकास कामांना खिळ बसली आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ सातबारा उतार्यावरील त्रूटी व पूर्वीच्या ग्रामपंचायतीचा निधीचे वाटप करावे अन्यथा प्रशासनास वांगी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा वांगी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन डॉ.विजय रोकडे यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button