शहर

बोईसर मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तातडीचे आदेश.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या अत्यंत संथ आणि निकृष्ट अंमलबजावणीबाबत माजी आमदार राजेश पाटील यांनी दिनांक १७ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी तिल्हेर व इतर १२ गावे, केळवे-माहीम व इतर १८ गावे, खानिवडे, गारगाव व इतर २२ गावे तसेच सफाळे-नंदाडे या महत्त्वाच्या पाणी योजनांमध्ये होणाऱ्या अनियमितता, संथ प्रगती आणि दर्जेदार कामाच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे विभागास तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. शासनाकडून १५ जुलै २०२५ रोजी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांना पत्राद्वारे आदेश देण्यात आले असून, ८ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेश पाटील यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या योजनांच्या पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीस गती मिळेल अशी अपेक्षा आहे. संबंधित दोषींवर कारवाई व्हावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा, हीच जनतेची मागणी आहे.”

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बोईसर मतदारसंघातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सुटण्यास मदत होणार असून लोकहितासाठी घेतलेली ही तातडीची कारवाई आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button