महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर राम प्रसाद बिस्मिल आणि स्वातंत्र्यवीर अशफाक उल्ला खान हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक—ॲड. शीतल चव्हाण.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

राम प्रसाद बिस्मिल (११ जून, इ.स. १८९७ – डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५ च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे ब्रिटीश सरकारने १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी दिली.बिस्मिल स्वातंत्र्य सेनानी तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केले. त्यात “बिस्मिल” हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)चे संस्थापक सदस्य होते.

अशफ़ाक उल्ला खान

(२२ ऑक्टोबर १९००, मृत्यू:१९२७) भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर सन १९२७ ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दू मध्ये तखल्लुस (टोपण नाव) हसरत हे होते . उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत .त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button