पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील 20 ग्रामपंचायतींच्या 20 पोलीस पाटलांपैकी 13 पोलीस पाटलांची पदे रिक्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील 26 गावांमधील 20 ग्रामपंचायतीच्या 20 पोलीस पाटलांपैकी फक्त 7 ग्रामपंचायतींचे पोलीस पाटील सध्या कार्यरत असून 13 ग्रामपंचायतीच्या 13 पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत.
1967 या काळापासून गावचा पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा प्राप्त झाला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका पोलीस पाटीलाची नेमणूक केली जाते.
या पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली जाते कारण गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गावात घडणारे गुन्हे खून दरोडे यांची माहिती पोलिसांना देणे
तसेच आकस्मित मृत्यू व संशयास्पद इसमांची माहिती पोलिसांना पुरवणे हे पोलीस पाटलाचे प्रथम कर्तव्य आहे. असे असताना देखील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विराथन बुद्रुक, जलसार,आगरवाडी, एडवण, कोरे, सरावली- वाढीव -वैतीपाडा,तिघरे,,मथाणे,खार्डी, केळवा, भादवे, दांडाखटाळी, या 13 ग्रामपंचायतींची पोलीस पाटलाची पदे रिक्त आहेत.
यापैकी खार्डी ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील सध्या सस्पेंड आहेत.तर केळवा, भादवे- मधुकरनगर ग्रामपंचायतीचे दोन पोलीस पाटील मयत आहेत. तर दांडाखटाळी पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच एडवण ग्रामपंचायतीच्या पोलीस पाटलांनी पोलीस पाटील पदभार स्वीकारलाच नाही यामुळे ते पद रिक्त आहे.
तर टेंभीखोडावे, कांद्रेभुरे, माकुणसार, उसरणी, चटाळे, अंबोडे-तिघरे, डोंगरे या 7 ग्रामपंचायतींचे पोलीस पाटील फक्त सध्या कार्यरत आहेत.



