महाराष्ट्र

सा़ंगली येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुस्लिम समाजातर्फे जिलेबी वाटप

उपसंपादक —–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो़़9730 867 448

सांगलीत 350 वा “शिवराज्याभिषेक ” दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . काँग्रेस चे नेते – जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील. यांच्या पुढाकाराने नयनरम्य आतिषबाजी आणि धुमधडाक्यात संपन्न झालेल्या कार्यक्रमाने, दिमाखदार लेसर शो ने सर्व शिवभक्तांचे “पारणें” फेडले .

सांगलीतील समस्त ” मुस्लिम समाजातर्फे” शिवभक्तांना 350 किलो जिलेबी ” वाटप करण्यात आले. एकोपा -बंधुता जोपासण्याचे कार्य बहुजन नेते असिफ बावा यांच्या पुढाकाराने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्थ सहभागाने सम्पन्न झाले .

जगातील सर्वश्रेष्ठ राजे अशी उपाधी मिळवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा शिवराज्यभिषेक दिन सर्व बहुजन – मराठा बांधवांसाठी “अमूल्य ठेवा” आहे . पेशवाई आणि परकीयांच्या गुलामगिरीला. झुगारणारे झुंझार राजे , सर्वधर्मसमभाव हा कृतीत आणणारे , बंधुभाव जपत ,सर्वसामान्यांना सन्मान देणारे माझे “शिवाजी राजे” आम्हा सर्वांचे “आदर्श” आहेत .

मुस्लिम समाजाने शिवजयंती , आंबेडकर जयंती. मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रमात भोजन ,नाश्ता आणि पाण्याची सोय करून हिंदू -मुस्लिम भाई -भाई याचा नारा दिला .

महाराष्ट्रात सांगलीच्या मुस्लिम समाजाच्या सर्वधर्मसमभावाच्या कार्याची दखल घेतली गेली .
कालच्या सांगलीतील कार्यक्रमात मुस्लिम तरुण जिलेबी ची “ताटे” घेऊन सर्व “माता -भगिनीं” आणिशिवभक्तांना देत होती.

हा “क्षण” व हे शिवमय वातावरण सुखावणारे व धर्मांधता निर्माण करणार्यांना जातीय तेढ निर्माण करणार्यांसाठी “वस्तुपाठ” दर्शवणारे ,व त्यांच्या डोळयांत अंजन घालणारे होते . जातीय विषवल्लींची “दृष्टी” असणाऱ्यांचा “दृष्टीकोन” बदलणारे आणि” गलिच्छ” राजकारण” करून स्वार्थ साधणाऱ्या प्रवृत्तीसाठी ही मोठी चपराक” होती .

जय जिजाऊ ..जय शिवराय इकबाल मुल्ला ( पत्रकार )
संपादक – सांगली वेध
संपादक -वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल – 8983587160

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button