करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी :- आयुब शेख यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया ह्यूमन राइट चे तालुका अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य आयुब शेख यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली आहेश्री शेख यांनी जिल्हाधिकारी पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सध्या भूमी

अभिलेख कार्यालयात कोणतेही कामकाज वेळेत होत नसून त्या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अक्षरशा पैशाची वारेमाप मागणी करीत आहेत अशी चर्चा जन माणसातून होत असल्याचे समजते. याला पायबंध घालण्यासाठी सी सी टीव्ही बसविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी या कार्यालयाकडे विशेष लक्ष देऊन संबंधित खात्याला सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश द्यावा सध्या भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. याशिवाय सदर कार्यालयातील कर्मचारी कधीही वेळेवर हजर नसतात. तेव्हा सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे अशी मागणी श्री शेख यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे अधिक माहितीस्तव श्री शेख यांनी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सोलापूर तसेच तहसीलदार कार्यालय करमाळा तसेच महसूल मंत्री यांना निवेदन पाठवले आहेत.



