अकलूज येथील कॅफे हाऊस वर 16 तरुण -तरुणीवर अकलूज पोलिसांची धडक कारवाई.

टाइम्स 9 मराठी न्यूज
अकलूजची तरुणाई मावा, दारू, नशा आणणारे इंजेक्शन व इतर प्रकारची व्यसने या माध्यमातून व्यसनाधीन होत असतानाच आता या तरुणाईला उरली सुरली वासनिक हौस भागवण्यासाठी ‘कॉफि शॉप’ या नावाखाली चालक जागा उपलब्ध करून देत असल्याने संपूर्ण तरुणाईंचे करिअर बरबाद होताना दिसत आहे.
दरम्यान अकलूज पोलिसांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अकलूज मधील एका कॅफे हाऊस वर अचानक धाड टाकून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या 16तरुण -तरुणीवर पोलीस अधिनियम 110-117अन्वये कारवाई केली. पोलीस त्या कॉफी शॉप मध्ये गेल्यानंतर अनेक तरुण तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आल्या.दरम्यान अकलूज पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाई मुळे असे गैरप्रकार करणाऱ्या इतर चालकांचे धाबे दनाणले आहेत.
सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली महिला पोलीस स्वाती कांबळे, पो हे. कॉ. सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विकी घाडगे,महिला पोलीस नाजनीन तांबोळी, दिलीप जाधव, अमोल बकाल आदींनी कारवाई केली.
अकलुज शहरात आणि परिसरात काॕफी शाॕप(कॅफे हाऊस ) चे पेव वाढले असून, परिसरात ठिकठिकाणी कॅफे हाऊस सुरु झाले आहेत. यातील अनेक शॉप्स अल्पवयीन तरुणाईला वाममार्गाकडे वळवीत आहेत. अशा आकर्षक शाॕप मधुन काॕफीशॉप च्या नावावर अश्लिलतेच्या चितेवर भारतीय संस्कृतीची होळी होत असल्याचे जळजळीत भिषण वास्तव समोर येत आहे.बेकायदेशीर पध्दतीने बनविलेल्या अनेक शाॕप मधुन अनेक कोवळी आयुष्य ऊध्वस्त होवु पाहत आहेत.त्यामुळे पालक वर्गातुन चिंता व्यक्त होत असुन,अनेक पालक अकलुजमधील काॕफी शाॕप विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
अकलुज शहरात काॕफी शाॕप नावाची संस्कृती जोमाने बळावत आहे.अनेक कायदेशीर बाबी धाब्यावर बसवुन शहरात सुरु असलेल्या काॕफी शाॕप मधुन अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी अश्लीलतेचा कळस गाठुन आई-वडीलांच्या विश्वासाला तिलांजली देताना दिसत आहेत.नगरपरीषदेकडुन हाॕटेल व्यवसायासाठी म्हणून परवानगी घेऊन .त्यामध्ये काही अक्षेपार्ह बदल करुन त्या ठिकाणी गैरवापर होत आहे.
सदरची ठिकाणे ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अल्पवयीन तरुणाईसाठी अश्लील कृत्यांसाठी हक्काची ठिकाणे बनली आहेत.पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत अनेक अल्पवयीन तरुण -तरुणी काॕफी शाॕप मध्ये तासन् तास अश्लील कृत्य करीत बसतात.त्यांच्या या कृत्याला त्या ठिकाणी बंदिस्त वातावरणात, मंद प्रकाश आणि संगिताची उत्तेजक धुन खतपाणी घालत आहे .
प्रौढ लोकांच्या नजरे पासुन थोड्याशा आडबाजुला असलेल्या आकर्षक नावांनी सदरचे शाॕप चालु आहेत .त्याठिकाणी लाखो रुपये खर्च करुन अशा पध्दतीने एकांत निर्माण केला जातो की तेथे येणारी अनेक अल्पवयीन तरुणाईंची शाळा काॕफी शाॕपमध्येच भरते आणि सुटतेही.सदरची जागा ही अशा प्रकारे बनविलेली असते की ,त्याठिकाणी बसल्यावर कुणालाही काहीच दिसत नाही.

काही महिन्यापूर्वी काही नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सर्व काॕफी शाॕप चालकांना बोलावुन बंदीस्त केबीन करु नका .आतमध्ये कोण बसलेयं हे दिसण्या इतपत केबीनची ऊंची ठेवा असे सांगितले होते.एक-दोन कारवाईही केल्या होत्या .परंतु त्यांची बदली झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या शॉप वाल्यानी आपले काळे धंदे पुन्हा नव्या जोमाने सुरु केले आहेत.
गैरकृत्य करणार्यांना ती जागा अतिशय सुरक्षित वाटत आहे.त्यामुळे काॕफी पिण्यासाठी दहा मिनिटांऐवजी तास न् तास बसुन अल्पवयीन मुलं -मुली त्याठिकाणी बसुन पालकांना फसवित असतात.काही शाॕप मधुन तासावर पैसे आकारले जात आहेत.पैसे देवुन आपले भाविष्य ऊध्वस्त करणार्या कोवळ्या मुला-मुलींना अनैतीकतेच्या जाळ्यातून सोडविण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची आणि समुपदेशानाची गरज आहे.
पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेवुन अनेक भावी अधारस्तंभ स्वैराचाराचा अवलंब करीत कोलमडु नयेत भरकटुन,आनेकांचे भविष्य ऊध्वस्त होवु नये म्हणुन पालकांनीही जागृत होवुन आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे काॕफी शाॕपच्या गोंडस नावाखाली भावी पिढीला वाम मार्गाला लावुन आपली पोळी भाजुन घेणार्या विकृतींनाही धडा शिकविण्यासाठी काही जागरुक पालकांनी एकत्र येवुन आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचे सांगितले आहे.
काॕफीचा एक कप पिण्यासाठी ही मुले -मुली अनेक तास येथे बसत आहेत.तासभर बसण्याचे सरासरी शंभर ते दोनशे रुपये आकारले जातात.वास्तविक पाहता,यांचा उद्देश जर सरळ असेल तर मग या ठिकाणी असलेल्या बंदिस्त केबीन कशासाठी बनविल्या आहेत.भारतीय संस्कृतीला वेशिवर टांगणाऱ्या या व्यवसायाला नेमके कुणाचे पाठबळ आहे.
हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असताना कोणीच का आवाज उठवीत नाही.कुठे गेले संस्कृती रक्षक?कुठे गेल्या महिला संघटना, कुठे गेल्या सामाजिक संघटना?
आई-वडीलांनी देखील आपला मुलगा -मुलगी नक्की शाळेत जातात का, अथवा खाजगी शिकवणीला जातात का याकडे लक्ष दिले पाहिजे.सध्या सर्वत्र लव्ह जिहाद च्या पार्श्वभूमीवर मोर्चे निघत आहेत. पण अशा काॕफी शाॕप मुळे लव्ह जिहादचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.हे आपल्या लक्षात कधी येणार?
घरून शाळा -महाविद्यालय मध्ये जातो म्हणून सांगणारे अनेक मुले -मुली आपल्या आई -वडिलांचा व शिक्षकांचा डोळा चुकवून कॉफी पिण्याचा बहाणा करून पाठीवर दफ्टर अडकवून या शॉप मध्ये अश्लील चाळे करीत बसत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन यांनी भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान शिक्षण घेण्याच्या वयात कॉफी शॉप मध्ये जाऊन अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पालकांनी व शिक्षकांनी देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपल्या पाल्यांचे मोबाईल चेक करायला हवेत.अकलूज परिसरातील अनेक ठिकाणी कॉफी हाऊस परिसरात आहेत.
अनेक कॉफी हाऊस मध्ये मुला -मुलींना एकांतात बसण्यासाठी पडद्याचे पार्टीशन करून बैठक व्यवस्था बनविण्यात आली आहे.इतरांना कोणाला आत काय चालले आहे. हे दिसू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.केवळ आपल्या आर्थिक स्वार्थासाठी हे कॅफे चालक असे गैरकृत्य करीत आहेत.या कॅफेत तरुण -तरुणीना निवांतपणे गप्पा मारता येतील. तसेच आपला कार्यभाग साधता येईल असा दृष्टिकोन ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अनेक तरुण तरुणी या कॅफेत जात आहेत.यामुळे भविष्यात मोठे अनर्थ घडू शकतात.
पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे. तसेच आपला मुलगा -मुलगी शाळा -महाविद्यालय मध्ये दररोज जातो का? हे तपासून बघायला हवे. तसेच शिक्षकांनी देखील वारंवार गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थी यांचेवर लक्ष ठेवून पालकांशी संपर्क ठेवायला हवा.
मागील आठवड्यात सातारा जिल्ह्यातील वाई येथील कॅफे मध्ये नामांकित महाविद्यालय मध्ये शिकत असलेल्ल्या मुलीला कॉफी पिण्याचा बहाणा करून कॉफी शॉप मध्ये नेवून त्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी त्या पीडित मुलीने वाई पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
सध्या सर्वत्र लव्ह जिहाद वरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कॉफी शॉप चे हे पेव सगळीकडेच वाढत आहेत. आता नागरिकांनीच सजग राहून आपल्या परिसरात असलेल्या कॉफी शॉप मध्ये जर असे गैरप्रकार होत असतील तर जवळच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद अथवा पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अशा कॉफी शॉप चे चालक यांचा निषेध करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करायला हवी.
नगरपरीषदेकडुन हाॕटेल व्यवसायासाठी परवानगी घेतली असेल .त्यामध्ये काही आक्षेपार्ह बदल करुन त्या ठिकाणी काही गैरकृत्य होत असतील. तर अशा काॕफी शाॕप ची पाहणी करून पोलीस प्रशासन यांचे सहकार्य घेऊन दोघांच्या समन्व्ययाने अशा कॉफी शॉप वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दयानंद गोरे,मुख्याधिकारी ,अकलुज नगर परीषद.

अकलूज मध्ये असे गैरप्रकार होत असलेल्या इतर कॉफी हाऊस वर देखील आपली करडी नजर असणार असून, त्यांचेवर देखील कारवाई करणार आहे. असे प्रकार होत असलेल्या कॉफी शॉप चे परवाने रद्द करण्याबाबत अकलूज नगरपरिषद ला पत्र देणार आहे.
दिपरत्न गायकवाड.पोलीस निरीक्षक.अकलूज पोलीस ठाणे.



