शहर

करमाळा तालुक्यातील जेऊर महावितरणच्या अंतर्गत असलेले त्रस्त शेतकरी महावितरण अधिकाऱ्याच्या आर्थिक मागणीमुळे आंदोलनाच्या पवित्र्यात

टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क

करमाळा तालुक्यातील जेऊर स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या वांगी नंबर 3 येथील शेतकरी महावितरण अधिकाऱ्याच्या आर्थिक मागणीमुळे त्रस्त झाले असून आंदोलनाच्या पवित्र असल्याचे बोलले जात आहे वांगी नंबर 3 येथे महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांचे आर्थिक लूट होत असून सध्या सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे वीज ग्राहक व शेतकरी त्रस्त झाल्या असल्याने वीज वितरण कंपनी बाबत संताप जनक वक्तव्य केले जात आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील नागनाथ ग्रुप व जाधव जॅकवेल येथे नागनाथ ग्रुपला थ्री फेज वीज 16 तास हवी असेल तर जाधव जॅकवेलला सिंगल फेज 16 तास सोडण्याकरिता प्रत्येकी मंथली 6000 रुपये महावितरणचे अधिकारी मागणी करतात त्याचप्रमाणे जाधव जॅकवेलला थ्री फेज 16 तास वीज हवी असेल तर नागनाथ ग्रुप वर 16 तास सिंगल फेज सोडण्याकरिता त्यांच्याकडेही 6000 रुपये ची मागणी महावितरणचे अधिकारी करत असल्याने शेतकऱ्यावर अन्याय होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

शिवाय सिंगल फेज वीज सोडण्याकरिता राजकीय दबाव येत असून आम्हाला नियमाप्रमाणे फक्त 8 तासच थ्री फेज वीज कायम द्यावी अशी मागणी वांगी नंबर 3 व परिसरातील शेतकरी करत असून असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र असल्याचे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात चौकशी करून स्वतःचा गल्ला भरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा

अशी मागणी जोर धरत असून मुळातच आसमानी आणि सुलतानी संकटामुळे तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याचे आपण सर्वत्र पहात आहोत मात्र महावितरण अधिकारी यांच्या या मागणीच्या त्रासामुळे एखादा कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही जर एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्त्या केली तर त्याला जवाबदार कोण ? त्यामुळे प्रसंगी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button