महाराष्ट्र

दि सासवड माळी साखर कारखान्याचेमॅनेजिंग डायरेक्टरपदी सतीश गिरमे यांची निवड

उपसंपादक – हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या नूतन मॅनेजिंग डायरेक्टरपदी कारखान्याचे विद्यमान होलटाईम डायरेक्टर सतीश दिगंबरराव गिरमे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

माळीनगर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटिंग शुक्रवार दि.७ जुलै रोजी कारखानास्थळी घेण्यात आली.कारखान्याचे विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे यांचे वय ७० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना कंपनी कायद्याप्रमाणे मॅनेजिंग डायरेक्टर पदावरून पदमुक्त व्हावे लागले,त्यामुळे या रिक्त होणाऱ्या मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी सतीश गिरमे यांची निवड करण्यात आली.या मिटिंगच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे हे होते.यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे,व्हा.चेअरमन परेश राऊत, संचालक अशोक गिरमे,गणेश इनामके,मोहन लांडे,राहुल गिरमे,विशाल जाधव,यश बोरावके,निळकंठ भोंगळे,निखिल कुदळे उपस्थित होते.

नूतन मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे हे कारखान्याचे संचालक मंडळात १४ वर्षे काम पहात आहेत.तसेच दि ११ जुलै २०२० पासून ते होलटाईम डायरेक्टर म्हणून यशस्वीरित्या काम पाहत आहेत.दि.९ जुलै २०२३ पासून श्री.गिरमे यांची पुढील २ वर्षासाठी मॅनेजिंग डायरेक्टरपदी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल श्री.गिरमे यांचा कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, भागधारक, सभासद, शेतकरी,अधिकारी, कामगार व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून त्याचप्रमाणे व्हाट्सअप मेसेजद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी श्री.गिरमे यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button