महाराष्ट्र

अखेर ती नऊ महिन्यांनी परतलीय…सुनिता विल्यम्स च्या स्वागताची अख्ख जग वाट पाहत होता…

आमीर मोहोळकर टाइम्स 9 न्यूज,अकलूज 9890299499

फक्त आठ दिवसासाठी अंतराळ स्थानकावर गेलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी तब्बल ९ महिने १३ दिवस तेथे अडकून पडले होते.संपूर्ण जग त्या सर्वांसाठी काळजीत असताना आज त्यांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन झाले.या काळात अनंत अडचणीवर मात करीत त्यांनी केलेले संशोधन सबंध जगाच्या उपयोगाचे ठरणार आहे,यात काही वाद नाही…

सुनिता विल्यम्स व त्यांच्या सहकाऱ्यांचा संयम,धैर्य आणि आत्मविश्वास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल…

अंतराळवीर ज्या ठिकाणी प्रयोग करतात त्या अंतराळ स्थानकाची देखभाल करण्याचे काम ते करतात.त्या ठिकाणी त्यांना नियमित व्यायाम करावा लागतो हे विशेष,अंतराळ स्थानक एखाद्या फुटबॉल मैदाना इतके मोठे आहे…

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतणार असल्याने एक वेगळीच उत्सुकता शास्त्रज्ञांना लागून राहिली आहे…

आठवडाभरासाठी गेलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर स्टारलाइनरमधील बिघाडामुळे नऊ महिने अंतराळात अडकले होते आज पहाटे ते पृथ्वी च्या कक्षेत प्रवेश करत आहेत…

अंतराळ स्थानक २८ हजार १६३ किलोमीटर वेगाने पृथ्वीला प्रदर्शना घालत असतो.त्यामुळे त्या ठिकाणी २४ तासांत १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होते.त्या ठिकाणी ९० मिनिटांत दिवस संपतो.१७,५०० मैल प्रतितास वेगाने अंतराळ स्थानक प्रवास करते.याचा अर्थ ते दर ९० मिनिटांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. आता सुनीता विल्मस आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तासांचा कालावधी लागणार होता आणि ते सुखरूप पोहचले देखील…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button