महाराष्ट्र

शुन्यातून विश्व निर्माण करणारे बागवान समाजातील एक थोर उद्योजक…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

गेल्या आठवड्यातील एक घटना मनाला चटका लावून गेली,झाले असे की आपल्या कर्तृत्व बळाच्या जोरावर कोड्रिंकस सारख्या व्यवसायात नव नवीन प्रयोग करून यश प्राप्त केलेल्या इंदापूर येथील बागवान समाजातील एक थोर उद्योजक हाजी अ रज्जाक बागवान यांचे निधन झाले.

ऐन उमेदीच्या काळात साधारणपणे 1975 साली अकलूज येथे कोल्ड्रिंक्स सारखा सिझनेबल व्यवसाय निवडताना आणि कुणाचे हि पाठबळ नसताना सुरवातीला “नौशाद कोल्ड्रिंक्स” या नावाने सुरु केलेल्या फर्म चा वाढता पाठिंबा पाहता हाजी रज्जाक साहेबांनी 1980 साली या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत इंदापूर येथे देखील दुसरी शाखा सुरु केली अन् “थंडी थंडी लज्जत और बेहतरीन स्वाद,कोड्रिंक्स में सिर्फ एक हि नाम नौशाद”… हे सिद्ध करून दाखवले…

परंतु गेल्या महिन्यापासून आजाराचे कारण झाले आणि हाजी अ रज्जाक साहेब आपल्यातून निघून गेले,त्यांच्या मागे पत्नी,चार विवाहित मुली,दोन मुले,सुना,जावई,नातू असा परीवार असून त्यांच्या जाण्याने कॉड्रिंकस च्या व्यवसायातील एका हुशार आणि थोर उद्योजकाला आपण मुकलो याची जाणीव हमेशा राहील,त्यांच्या जाण्याने कुटुंबावर पडलेले दुःखाचे सावट लवकर दूर होओ,हिच अल्लाह व ईश्वर चरणी प्रार्थना…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button