अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात अकरावी सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे पेढा व गुलाब पुष्प देऊन स्वागत

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय आज दिनांक 10/7/2023 रोजी इयत्ता अकरावी आर्ट्स ,कॉमर्स आणि सायन्स या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे , कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे सर , ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. राजकुमार इंगोले सर उपस्थित होते

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दतात्रय बागडे सर यांनी विद्यालयाची ध्येयधोरणे व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले .पर्यवेक्षक इंगोले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या महाविद्यालयामधील मागील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली होती त्याच पद्धतीने पुढील गुणवत्ता देखील चांगली राहावी संस्थेच्या नियमांचे पालन करावे व सर्व विद्यार्थ्यांनी आनंदामध्ये शिक्षण घ्यावे असे सांगितले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक इतर प्रतिनिधी उपस्थित होते .




