करमाळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नवनिर्वाचित नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार संपन्न.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
दिनांक 20 जून गुरुवार रोजी माढा लोकसभेचे नवनिर्वाचित नुतन खासदार मा. धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेब करमाळा येथे कृतज्ञता मेळावा गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने करमाळा शहरात आले असता त्यांचा सत्कार सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आला
यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, संतोष वारे तसेच मा. उपनगराध्यक्षअहमद चाचा कुरेशी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर भाई सय्यद, आझाद भाई शेख रमजान भाई बेग, जिशान भाई कबीर, मुसतकीम भाई पठाण, आरबाज भाई बेग, इकबाल भाई शेख, शाहीद भाई बेग, अलीम भाई पठाण,जाहागीर बेग,फिरोज सय्यद, महेबुब मदारी, कय्युम मदारी , जाहगीर शेख बिलाल भाई मदारी व अनेक मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

माढा लोकसभेचे नवनिर्वाचित नूतन खासदार यांचा दिनांक 20 जून 2024 गुरुवारी करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये कृतज्ञता तसेच आभार भेट दौरा होता यावेळी करमाळा शहरातील सकल मुस्लिम बांधवांनी त्यांचा यथोचित सत्कार केला
मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी तसेच समस्या मी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील असे श्री खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले



