महाराष्ट्र

उपळाई बुद्रुक ग्रामपंचायतचा अजब कारभार मुस्लिम समाज बांधवांचे आंदोलन सुरू होतात प्रशासनाला आली जाग ?

प्रतिनिधी… रियाज मुलाणी

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील मुस्लिम समाज बांधव व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन 15 ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले सन 2021-22 च्या आराखड्यात मुस्लिम समाजासाठी शौचालयाचे 4 युनिट 15 वा वित्त आयोग मधून मंजूर झाले आहेत,ते शौचालय अद्याप पर्यंत बांधले गेले नसल्याने मुस्लिम समाज बांधव व तसेच गावातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका संघटक इसाक काझी यांनी पंचायत समिती कुर्डुवाडी यांना ग्रामपंचायतच्या अजब कारबाराबद्दल शौचालय विषयी रितसर निवेदन दिले यानंतर प्रशासनाला जाग आली आणि , विस्तार अधिकारी डि जी सुतार यांनी प्रत्यक्षात स्थळपाहणी केली असता मुस्लिम गल्लीत शौचालय बांधलेच नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले तरी या ठिकाणी शौचालयाची नितांत गरज असून यासाठी जागा देखील उपलब्ध आहे हे काम त्वरित सुरू करण्याचे लेखी आश्वासन आंदोलन स्थळी झालेल्या चर्चेत समाज बांधवांना देण्यात आले 2 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हे शौचालय बांधून देण्याचे त्यांनी मान्य केले.

या नंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन हे तात्पुरते स्थगित केले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उपळाई बुद्रुक मुस्लिम ट्रस्ट उपाध्यक्ष नबीलाल तांबोळी, खजिनदार शामिर सय्यद,हाजी शफीउल्ला काझी ,अस्लम आतार, शब्बीर कोरबु, इलाही सय्यद,कादर कोरबु , अब्दुल सय्यद,सनाऊल्ला काझी, मेजर झुबीरपाषा काझी,हाजी अजमतुल्ला काझी, मुन्ना सय्यद, मुन्ना तांबोळी,राजू कोरबु,रहिम काझी , रब्बेसलाम काझी,इलाही सय्यद,सादीक काझी,गफूर काझी, पप्पू तांबोळी,लतीब काझी,तायर काझी,सैफ काझी,झाकीर काझी, मैनुद्दीन काझी,मेजर रियाज काझी,प्रहार शेतकरी संघटनेचे सचिव मुस्तफा काझी ,आदिल काझी, मोहसीन तांबोळी, इस्माईल सय्यद,करिम सय्यद,अजमेर कोरबु, यांच्या सह सर्वच मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले व आपल्या समाजाच्या कोणत्याही योजनेतून आलेल्या कामावर अशी फसवणूक वा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला तर सर्व समाज एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी सह्या करण्यात आल्या, तसेच आपल्या समाजासाठी मंजूर होऊन आलेली सर्व कामे लक्ष देऊन दर्जेदार व मजबूत करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे ठरले त्यानंतर सर्वानी मस्जिद मध्ये एकत्र शुक्रवारची नमाज पठण करुन आंदोलन स्थळी आलेले गावातील नागरिक, पत्रकार, पोलिस अधिकारी, सर्वांचे आभार मानून आंदोलन शांततेत पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button