महाराष्ट्र

जव्हार पंचायत समिती सभापती विजया दयानंद लाहरे यांच्या मार्फत चौक गावात नवीन अंगणवाडीचे उद्घाटन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

गुरुपौर्णिमेचे अवचितसाधून जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत चौक येथे जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजया दयानंद लाहरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत चौक येथे नवीन अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम पूजा-अर्चना श्रीफळ फोडून अंगणवाडी उदघाट्नाची रिबीन कापण्यात आली व अंगणवाडीतील सर्व मुलांना चॉकलेट वाटून तोंड गोड करण्यात आले.

गेल्या पंधरा वर्षा पासून येथे अंगणवाडी नसल्याने या गावातील समाजमंदिरात अंगणवाडी भरत होती. या परिस्थीचा पाठपुरावा हा जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजया दयानंद लाहरे यांच्या मार्फत प्रयत्न करण्यात आला होता. त्यांचा या प्रयत्नांना यश आल्यामुळे चौक गावाला नवीन अंगणवाडी मिळाली आहे.या अंगणवाडी उद्घाटनाच्या कर्यक्रमासाठी उपस्थित कविता अजित वळवी ग्रामपंचायत सदस्य, जितन जाणू कडू ग्रामपंचायत सदस्य, कृष्णा मावंजी काटेला-शाळा वेवस्थापन समिती अध्यक्ष,अजित बाबू वळवी तसेच ग्रामस्थ,रामदास मोहंडकर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौक गावात गेल्या पंधरा वर्षा पासून अंगणवाडी ही गावातील समाज मंदिरात भरत होती. आमच्या या अंगणवाडीची व गावातील शिक्षणाची परिस्थिती जाणून घेऊन पंचायत समिती सभापती विजया दयानंद लाहरे यांनी ही बाब शिक्षण खात्याला सांगून पाठपुरावा करून अखेर या चौक गावाला नवीन अंगणवडी मिळवून दिल्या मुळे आम्ही सर्व ग्रामस्थ पालक वर्ग सभापती मॅडमना मनापासून धन्यवाद देतो.( सोनाली तुंबडा.
अंगणवाडी सेविका चौक )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button