शहर

खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण दरम्यान रेल्वे उड्डाणपूल संदर्भात बैठक संपन्न

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा वृत्तांत
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण, डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर, वेस्टर्न रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक खासदार राजेंद्र गावित व जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय पालघर समिती सभागृहात पार पडली.या बैठकीत केळवे रोड येथील पूर्व पश्चिम रेल्वे भुयारी मार्गात गेल्या अनेक दिवसापासून पावसाचे पाणी भरून असल्याने तसेच वंजारवाडा बोईसर येथे अंडरपास ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिज त्याचप्रमाणे टेपाचापाडा साईनगर येथे पदाचारी पुल संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

कोकण विभागात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पालघर सारख्या भागात सुद्धा पावसाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग न करता फ्लाय ओव्हर ब्रिज अथवा पादचारी पूल बांधावेत असे निर्देश संबंधितांना देण्यात आले. या करिता रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करावे रेल्वे संबंधित खासदार स्वतः वैयक्तिक रेल्वे बोर्डाची संपर्क करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

पश्चिम रेल्वेने वैतारणा ते वाढीवबेट करीता पदाचारी पाथ वे मंजूर केल्याबद्दल खासदारांनी आभार व्यक्त केले.

सदर बैठकीस जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वरिष्ठ उपविभागीय कार्यकारी अभियंता पश्चिम रेल्वे, मुख्य प्रबंधक डीफसीसी, कार्यकारी संचालक एम आर वि सी सी. डीएफसी व एमआरडीसीसी चे कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button