महाराष्ट्र

अकलुज येथील शिवतीर्थ आखाड्यात राष्ट्रीय स्तरावरील त्रिमुर्ती केसरी स्पर्धेचे आयोजन.प्रमुख संयोजकसयाजीराजे मोहीते पाटील यांची माहिती…

कार्यकारी संपादक हमीद मुलाणी

दिनांक २९ नोव्हेंबर ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील ( आक्कासाहेब ) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व जयसिंह मोहीते पाटील ( बाळदादा ) व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समीती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य अशा कुस्तींचे आयोजन करण्यात आले आहे

या स्पर्धेसाठी भारत देशाचे नामवंत मल्ल कर्तारसिंह उपस्थित राहणार आहेत.सदर स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस २००००० लाख.द्वितीय बक्षीस १’५०००० तृतीय बक्षीस १००००० व चौथे बक्षीस ५०.००० हजार रुपये ठेवल्याची माहिती संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहीते पाटील यांनी दिली.

या स्पर्धेसाठी पहिली कुस्ती प्रविण भुलरिया ( हरियाना केसरी ) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी कोल्हापुर ) व दुसरी कुस्ती समीर शेख ( हनुमान आखाडा पुणे ) विरुद्ध सत्पाल सोनटक्के ( छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल करमाळा ) यांच्या होणार आहेत.

सदर स्पर्धेचा जास्तीत जास्त कुस्ती शौकीनानी उपस्थीत राहुन आनंद घेण्याचे आवाहन‌ सयाजीराजे संग्रामसिंह मोहीते पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button