शहर

विरार विवा कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या (19) वर्षीय चिराग लोखंडे याचा सफाळे कपासे तलावात बुडून मृत्यू

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आपल्या दोन मित्रासोबत सफाळे कपासे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय चिराग लोखंडे याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील सफाळे माकणे येथील नाईन स्टार रेवती अपार्टमेंट येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारा मूळचा सफाळे एडवण गावातील रहिवासी चिराग आकाशदीप लोखंडे वय वर्ष (19) हा विरार येथील विवा कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करत होता.

गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्हाधिकारी यांनी शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केली होती. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे चिराग लोखंडे आपल्या दोन मित्रासोबत गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी दोनच्या दरम्यान सफाळे कपासे येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता

त्याला या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व तो खोल पाण्यात गेल्यामुळे त्याचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डि.के. सावंत करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button