महाराष्ट्र
खासदार राजेंद्र गावित आपल्या दारी… विद्युत विभागाच्या संदर्भात वसई येथे 23 जून रोजी बैठक आयोजित.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
वसई तालुक्यातील वसई विरार शहर व ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या विजेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यां त्वरित सोडवण्याच्या हेतूने पालघर लोकसभा खासदार राजेंद्रजी गावित यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खासदार आपल्या दारी हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता विश्वकर्मा हॉल आनंद नगर डॉक्टर बिजूर डोळ्यांचे हॉस्पिटल शेजारी वसई पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास वसई विरार विद्युत विभागातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार असून ज्या नागरिकांच्या विजेच्या बाबतीत समस्या प्रश्न असतील अशा नागरिकांनी आपल्या कागदपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन स्वतः पालघर लोकसभा खासदार राजेंद्रजी गावित यांनी नागरिकांना केले आहे.



