महाराष्ट्र

शारिरीक व मानसिक विकासासाठी योगच प्रभावी, —दीप रतन गायकवाड.महर्षी संकुलात जागतिक योग दिन साजरा

उपसंपादक—– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज -शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित, महर्षि संकुल यशवंतनगर येथे जागतिक योग दिन उत्साहात पार पडला. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनानिमित्त योगा प्रशिक्षणाचेआयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी दिपरतन गायकवाड (पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस स्टेशन) व प्रशाला समिती सभापती ॲड.नितीनराव खराडे यांच्या शुभहस्ते सोलापूर जिल्हाचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते पाटील काकासाहेब व श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील आक्कासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने संपन्न झाला.

दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक मार्गदर्शन करताना म्हणाले ,योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे काळाची गरज आहे. शारिरीक व मानसिक विकास साधण्यासाठी योग साधना प्रभावी आहे.

संकुलातील सहशिक्षक प्रा. धनंजय देशमुख एम .ए .योगशास्त्र यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून ताडासन ,पद्मासन, वज्रासन, हलासन अशा विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले .त्याचप्रमाणे ओंकार, प्रार्थना ,पूरक हालचाली सूर्यनमस्कार प्राणायाम, ध्यान,योगनिद्रा आणि विविध योगासने करण्यात आली.

संकुलातील सर्व विद्यार्थी , प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, विनोद जाधव, संकुलातील मुख्याध्यापक शिवाजी पारसे, सविता गायकवाड ,उपमुख्याध्यापक भारत चंदनकर,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करत उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले तर आभार र.वी. गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button