शहर

पालघर जिल्ह्यातील कासा वाघाडी येथील प्रसिद्ध भीम बांधावर घडली दुर्दैवी घटना… डहाणू येथील मीना पराड या महिलेचा पाण्यात  बुडून मृत्यू  

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

डहाणू  तालुक्यातील एक महिला आपल्या कुटुंबासोबत भीम बांधावर पर्यटनासाठी गेली असताना  तिचा भीम बंधार्‍यावरील 40 फूट खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना गुरुवारी दुपारी  घडली असून या महिलेचे नाव मीना विलास पराड वय वर्ष ( 41) राहणार धानिवरी तालुका -डहाणू,जिल्हा-पालघर असे असून ती  गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता  तिचे पती विलास पराड  आणि तिचा भाऊ व वहिनी यांच्यासोबत  कासा वाघाडी येथील  भीम  बांधावर   कपडे धुण्यासाठी आणि कपडे धुऊन झाल्यावर तिथेच जेवण करून फिरण्याच्या उद्देशाने गेले होते .

मीना पराड ही भीम बांधाच्या  पाण्यात उतरल्यावर तिला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती 40 फूट खोल पाण्यात जाऊन  पाण्याखाली गेली ती वर आलीच नव्हती यानंतर   तब्बल 18 तास  तिचा पाण्यात शोध घेऊन  डहाणू येथील मच्छीमार समाजाच्या नागरिकांनी गळाचा सहाय्याने तिचा शोध घेऊन तिचा दगडाच्या आत अडकलेला मृतदेह शुक्रवार दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता  पाण्याबाहेर काढला आहे.

याबाबत कासा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस करत आहेत.

मीना पराड  ही महिला  मुंबई येथील एका संस्थेमार्फत डहाणू तालुक्यात विधवा आणि अनाथ लहान मुलांना आणि गरजूंना अन्न दान वाटप करण्याचे काम करत होती. 

तिचे पती विलास पराड हे अपंग असून तिला एक (21) वर्षाची मुलगी आणि एक (24) वर्षांचा मुलगा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button