अकलूज दत्तनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक योगा दिन साजरा

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.. 97 30 867 448
21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्या अनुषंगाने आज दिनांक २१ जून २०२३ रोजी जगभरात योगदिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर अकलूज येथे योग दिन विविध योगासने ,प्राणायाम करून साजरा केला गेला.

शाळेच्या मुख्याध्यपिका . महादेवी चांगदेव गुंड यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे, योगासनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर विविध शारीरिक हालचाली, व्यायाम प्रकार ,विविध प्रकारची योगासने, सूर्यनमस्कार घेण्यात आले. माजी मुख्याध्यापक मारुती.ना.क्षीरसागर सर यांनी आज योग दिनानिमित्त शाळेला भेट देऊन मुलांना विविध प्रकारचे व्यायाम प्रकार व योगासने करून दाखविली व मुलांकडून करून घेतली.

प्रत्येक योगासनाचे फायदे योगासने सुरू असताना शहजादी काझी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पोटावर व पाठीवर झोपून करावयाची आसने, बसून करावयाची आसने, उभे राहून करावयाची आसने यांचे प्रात्यक्षिक . शहजादी काझी मॅडम, .फरजाना कोरबु मॅडम, सुजाता कदम, राणी धोत्रे अस्मिता केवटे मॅडम यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले शेवटी प्राणायाम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमात व्यवस्थापन.समितीचे अध्यक्ष . दीपकभाऊ दोरकर यांनी भेट देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला



