महाराष्ट्र

‘भगव्या रंगाचा श्वानही असतो..’, रामगिरी महाराजांना लफंगा म्हणत मिटकरींची तुफान टीका

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छ. संभाजीनगर आणि अहमदनगर येथे तणाव निर्माण झाला होता. याच प्रकरणात रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. पण त्यानंतर रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असं असताना आता महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराजांवर जहरी टीका केली आहे.

रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. या सगळ्या घटनेबाबत बोलताना महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

‘माझं म्हणणं आहे की, बांग्लादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही. पण बांग्लादेशच्या अत्याचाराचा आणि भारताचा संबंध काय? कोण भारतातील वातावरण खराब करतंय.. कोणत्या मुसलमानाने हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले आहेत? किंवा कोणत्या हिंदूने मुस्लिमांबाबत अपशब्द काढलेत..?

‘यामुळे अशा लोकांवर कायदेशीर वचक असला पाहिजे. कुठल्याही धर्माची विटंबना करताना.. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना.. असे प्रकार करणं म्हणजे संन्यासाच्या वेषात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे.’दुसऱ्या धर्माचा अवमान करा असं रामायणाने सांगितलं नाही किंवा महाभारताने, बायबलने किंवा कुराणाने सांगितलं नाही.’

‘अशाप्रकारे जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. मी तर उलट म्हणेन की, अशा व्यक्तीची पाठराखण करू नये. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली याला तात्काळ अटक करावी. जर एखाद्या धर्माबाबत बोलून दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचं मूळ.. जसं मालेगावच्या दंगलखोरीचं मूळ होतं.. तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का? अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे.’ अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button