28 ऑक्टो ला भरणार उत्तमराव जानकर उमेदवारी अर्ज…

माळशिरस तालुक्यातून हजारों लोक उपस्थित राहण्याची शक्यता…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
२५४ – माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार म्हणून उत्तमराव जानकर हे सोमवार दि २८ऑक्टोंबर २०२४ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली…

या अनुषंगाने संपूर्ण माळशिरस तालुक्यात उमेदवार उत्तमराव जानकर,युवानेते अर्जुनसिंह मोहिते-पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस),ज्येष्ठ नेते बाबाराजे देशमुख (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर),संतोष भैय्या राऊत (ता प्र माळशिरस तालुका उबाठा),पै दत्ता मगर (नि मगराचे),साजिदभाई सय्यद,माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हि सुत्रांनी दिली…
याप्रसंगी प्रमुख मान्यवर-पदाधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले,यावेळी देशमुखवाडी व डोंबाळवाडी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते…



