श्रीपूर मधून अवजड वहाने वेगात जात असल्याने अपघाताचा धोका वाढलातसेच रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे अरुंद रस्त्यावर रहदारीची सतत कोंडी

बी.टी.शिवशरण
श्रीपूर परिसरातून माळीनगर पंचवीसचार रस्त्याच्या कामासाठी मोठी अवजड वहाने बेफाम जात आहेत तसेच रस्त्यावर स्थानिक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद केले आहेत त्यामुळे एका वेळी एकच चारचाकी गाडी जाऊ शकते त्यामुळे श्रीपूर परिसरात सतत रहदारीची कोंडी झाल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही किंवा यावर उपाय निर्णय याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन अजिबात लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा होत आहे
स्थानिक व्यापारी टपरीधारक यांनी त्यांच्या खरेदी घेतलेल्या जागा याच्यापुढे वाढीव अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत साखर कारखाना गळीत हंगाम सुरु असतो त्यावेळी तर नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते श्रीपूर मधून पाच साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वहाने जात असतात त्या दरम्यान अनेकदा लहान मोठे अपघातांची मालिका सुरु असते दरम्यान श्रीपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने अकलूज पोलीस स्टेशनं उपविभागीय पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज जिल्हा परिषद बांधकाम विभाग सोलापूर यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे श्रीपूर शहर कार्यकारिणी व अध्यक्ष गणेश सावंत यांनी दिली आहे या बाबत स्थानिक नागरिक व इतर सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्या सह्या व निवेदन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे



