महाराष्ट्र

बोन्साय क्लब सोलापूर आयोजित “प्रारंभिक कार्यशाळे “ला उत्तम प्रतिसाद

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. .97 30 867 448

सोलापूरमधील नवशिक्या बोन्सायप्रेमींसाठी “बोन्साय “अर्थात वामनवृक्ष क्लब,सोलापूर आयोजित प्रारंभिक कार्यशाळेला सर्व वयोगटातील सोलापूरकर बोन्सायप्रेमींकडुन उत्तम प्रतिसाद आहे.

”बोन्साय क्लब “हा परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बागकर्मी, बोन्सायप्रेमी श्रीमती झरीन आमरिया. होत्या तर मंद्रुपच्या. संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्रा.डाॅ.कृष्णदेवराय गरड. यांची प्रमुख उपस्थिती होती. अकलुजच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे निवृत्त प्रा. रामलिंग सावळजकर. हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.जुळे सोलापूरातील जुन्या ims जवळच्या Cult Banquet – Tea Post या ठिकाणी रविवारी ही कार्यशाळा संपन्न झाली

कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये प्रो.रामलींग सावळजकर यांनी बोन्साय झाडे व कले बद्दल तपशीलवार माहिती दिली. रुट कटिंग ,प्रुनिंग,
रिपाॅटिंगच्या पध्दतीची माहिती देऊन झाडांच्या बोन्सायची प्रात्यक्षिकेही करुन दाखवली.

प्रारंभी परसबाग सोलापूरची आणि बोन्साय क्लब चे संस्थापक नारायण तथा नानाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले .बोन्साय क्लबच्या प्रारंभाचा हेतु विषद केला.याप्रसंगी श्रीमती झरीन आमरिया , .रामलिंग सावळजकर , डॉ.कृष्णदेवराय गरड यांचा अनुक्रमे श्रीमती लीलाताई हरचेकर,.नितीन अणवेकर, श्रीराम रामदासी यांच्या हस्ते शाल आणि रोप देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

वामनवृक्ष हे बोन्साय चे भारतीय नाव. मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती म्हणजे वामनवृक्ष पुरातन काळातील ऋषी मुनींनी प्रथमत: ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. जपानी लोकांनी याच वामनवृक्षाच्या प्रत्यक्षातील संकल्पनेला कलेची जोड देऊन बोन्साय कलाविकसीत केली अशी माहिती प्रो.सावळजकर यांनी याप्रसंगी बोलताना दिली.बोन्साय ही निसर्गाचीच निर्मिती आहे. डोंगर,द-या,विहिरी,खाणी,पडकी घरे* अशा अनेक ठिकाणी निसर्गतः कुपोषित झाडे आपणाला मिळतात.त्याची बोन्साय छान होतात. अशी झाडे आणुन आपण कलात्मक रित्या त्यांना दीर्घायुष्य प्रदान करु शकतो.अशी बोन्साय झाडे बनवण्यासाठी दीर्घकालीन संयम, सातत्य,निरीक्षणाच्या माध्यमातून बोन्साय कला अवगत होऊ शकते* असे सांगुन समस्त बोन्सायप्रेमींनी बोन्साय ही जपानी कला आत्मसात करावी असे आवाहन केले.डाॅ.गरड यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुर्मिळ वृक्षसंपदे बाबत आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेच्या अंतिम कार्यानुभव पत्रामध्ये सहभागी बोन्सायप्रेमींनी सोबत आणलेल्या झाडांचे स्वहस्ते बोन्साय करुन रोपण करण्याचा कार्यानुभव* घेतला. प्रो.सावळजकर, डॉ.गरड,.नितीन अणवेकर,.श्रीराम रामदासी यांनी कार्यानुभवासाठी मार्गदर्शन केले.सर्व सहभागींना कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.झाडांसोबत सर्वांचा ग्रुप फोटो घेण्यात आला. त्यापूर्वी दुस-या सत्रामध्ये सहभागी सदस्यांनी घरुन आणलेल्या भोजनाचा एकत्रित आस्वाद घेतला.

बोन्साय क्लबच्या संस्थापक सदस्या शुभदा पाटील,समुह सदस्या अश्विनी करंदीकर यांनी सदस्यांच्या नोंदणीची जबाबदारी पार पाडली.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी .योगेश जक्कल,.ओम धुत्तरगावकर,.राजेंद्र आमले,.जितेंद्र भडंगे,.धनंजय हंदिगोळ,श्री.सुनील पवार यांनी या परसबाग टीम मधील सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले..नारायण पाटील यांनी Cult Banquet चे संचालक .सिध्देश्वर जोकारे यांच्या व त्यांच्या कर्मचा-यांनी केलेल्या सहकार्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले

संपर्क : नारायण पाटील
९९६०००८२२०
९१४५७९०९३८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button